ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा नगर परिषद हद्दीतील दुकानावरील नामफलक मराठीत करावे – राजेश भगत, मुख्याधिकारी

अन्यथा कायद्यात नमूद केल्यानुसार संबंधित दुकानचालकांवर होणार कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नगर परिषद वर्धा हद्दीतील सर्व व्यापारी आस्थापना दुकान मालक व वाणिज्य मालमत्ता धारक व हितसंबधी यांना कळविण्यात येते की, दुकानावरील पाट्यांवर मराठी भाषेवरील नाम फलक सुरुवातीला लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील टंक आकार इतर भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. असा आदेश नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

त्यानुसार वर्धा शहरातील सर्व व्यापारी आस्थापना दुकान मालक व वाणिज्य मालमत्ता धारक व हितसंबंधी यांना मराठी भाषेत नामफलक लावणे बंधनकारक राहील सबब सर्व आस्थापना व दुकान धारकांनी सदर नियमानुसार नामफलक हा प्रारंभी मराठी देवनागरी लिपित लिहून नामफलकात बल (७) मातदिवसाच्या आत करून प्रदर्शित करावा, अन्यथा कायद्यात नमूद केल्यानुसार संबंधित दुकानचालकांवर कार्यवाही करण्यात येईल. अशी सूचना नगर परिषद द्वारे देण्यात येत आहे.

राजेश भगत, मुख्याधिकारी, नगर परिषद, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये