ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओबीसी कोल एम्प्लॉइज असोसिएशनच्या न्याय मागण्या सोडविण्यास सर्वतोपरी सहकार्य करणार- अहीर

नागपुरातील एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनच्या कार्यालयाचे अहीर यांचे हस्ते उद्घाटन

चांदा ब्लास्ट

बॅकवर्ड क्लास (ओबीसी) कोल एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनशी संबंधित न्यायोचित मागण्या मार्गी लावण्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.

नागपूर येथे असोसिएशन च्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दि. २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी वेकोलि मुख्यालय परिसरातील कार्यालय उद्घाटन प्रसंगी सीएमडी मनोज कुमार, तांत्रिक संचालक ए. के. सिंह, बॅकवर्ड क्लास कोल एम्प्लॉइज असोसिएशन सीआयएल चे अध्यक्ष गुलाबसिंह महासचिव जयबहादुर सिंह, वेकोलि संचालन समिती सदस्य शिवकुमार यादव, रा.को.ख.म.सं. वरीष्ठ कामगार नेते एस. क्यु. जमा आदी मान्यवर अतिथींची प्रामुख्याने उपस्थित होती.

यावेळी हंसराज अहीर यांनी ओबीसी एम्प्लॉइज वेल्फेअर असो. च्या मागण्यांविषयी गंभीरपणे दखल घेवून न्याय मिळवून देवू असे सांगत संपुर्ण सहयोग दिला जाईल असेही त्यांनी सांगितले. या कार्यकमास ओबीसी वेल्फेअर असो. चे अध्यक्ष शरद धांडे, सचिव राकेश कडु, संजय मिसलवार, सुदामा यादव, अजय यादव, व्यंकटेश सुरा, शिवा मिन्नरवार, राजेश पिंपळशेंडे, विकांत जी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये