Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार मनोज कायंदे यांनी दिले निमंत्रण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेड राजा येथे दरवर्षी प्रमाणे येत्या 12जानेवारी ला होणाऱ्या राजमाता जिजाऊमाँ साहेबांच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक येऊन महापूजा करावी अशी आग्रही विनंती आमदार मनोज कायंदे यांनी मतदार संघाचे वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपुर येथे प्रत्यक्ष भेटून केली.

यावेळी सिंदखेड राजा मतदार संघामध्ये असलेल्या विविध प्रलंबित समस्या बाबत सविस्तर चर्चा केली, सिंदखेड राजा विकास आराखडा तत्काळ मंजूर करून निधी देण्याची विनंती केली,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले, याप्रसंगी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ॲड नाझेर काझी व इतर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये