ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजकार्य विद्यार्थ्यांनी आनंदवन वरोरा येथे दिली भेट

समाजसेवक बाबा आमटे यांचे यांचे जाणून घेतले कार्य

चांदा ब्लास्ट

स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील  एम.एस.डब्ल्यू व्दितीय वर्षाच्या वैद्यकिय व मन: चिकित्सक  समाजकार्य विशेषीकरणाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी आनंदवन, वरोरा येथे भेट दिली.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्टरोग्यांच्या पुनर्वसनासाठी वरोरा येथे आनंदवन स्थापन केले. समाजात आजही कुष्टरोग्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही त्यामुळे आनंदवन येथे महारोगी सेवा समिती तर्फे विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून कुष्टरोग्यांना प्रशिक्षण दिले जाते व त्यांचे पुनर्वसन केल्या जाते. समाजकार्य विद्यार्थ्यांनी येथील विवीध विभागांना प्रत्यक्ष भेटी दिल्या व कार्य जाणून घेतले.  आनंदवन च्या कार्याची समन्वयक दीपक शिव यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
संस्था भेट समन्वयक प्रा. डॉ. जयश्री कापसे व प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी एक्सप्लोझर संस्था भेटी देत आहेत. यावेळी संचालन व आभार दिव्या पोटदुखे हिने व्यक्त केले.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये