Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजकार्य विद्यार्थ्यांनी विमालादेवी आयुर्वेदिक महाविद्यालय, वांढरी येथे दिली भेट

भेटीतून जाणून घेतले रुद्राक्ष वृक्ष व आयुर्वेदिक उपचार कार्य

चांदा ब्लास्ट

 स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील एम.एस.डब्ल्यू व्दितीय वर्षाच्या वैद्यकिय व मन: चिकित्सक समाजकार्य विशेषीकरणाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी आयुर्वेदीक महाविद्यालय, वांढरी येथे एक्सप्लोझर भेट दिली.

श्रीमती विमलादेवी आर्युवेदिक महाविद्यालय, वांढरी, घुग्गुस रोड येथे विद्यार्थ्याना आर्युवेदिक शिक्षण दिल्या जाते. चंद्रपुरात होमिओपॅथिक संस्था आहेत परंतु नवीन ज्ञान मिळावं यासाठी २०१० पासुन आयुर्वेदीक महाविद्यालय सुरु करण्यात आले. इथे आयुर्वेदिक औषध निर्माण केले जात असून अनेक आयुर्वेदिक वृक्षांची लागवड केलेली आहे. प्रामुख्याने रुद्राक्ष वृक्षाची लागवड केलेली आहे. आयुर्वेदिक दवाखाना इथे असून रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार केले जातात. कमी दरात औषध उपलब्ध करुन दिल्या जाते. आजवर अनेक विद्यार्थी या महाविद्यालातून आपले शिक्षण पूर्ण करुन डॉक्टर झालेले आहेत. डॉ. राजू गोजे, डॉ. अखिलेश देशमुख यांनी या महाविद्यालया विषयी माहिती समाजकार्य विद्यार्थ्यांना दिली.

संस्था भेट समन्वयक प्रा. डॉ. जयश्री कापसे व प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी एक्सप्लोझर संस्था भेटी देत आहेत. यावेळी संचालन व आभार प्रीतम दुर्गे यांनी व्यक्त केले

.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये