Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मध्य भारतातील सर्वात मोठ्या ऍग्रो व्हिजन कार्यक्रमात घरोघरी परबाग

एक आरोग्यदायी उपक्रम या विषयावर दिपाली व अंजली राठोड यांचे सादरीकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर येथे मध्य भारतातील सर्वात मोठे ऍग्रो व्हिजन द्वारा भव्य कृषि प्रदर्शनी व अनेक महत्वपूर्ण विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र,कार्यशाळा आणि वेगवेगळे मेळावे आयोजित करण्यात येतात. लाखों शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणलेल्या ऍग्रो व्हिजन कार्यक्रमात नागपूर येथील आठव्या व नवव्या वर्गात शिकणाऱ्या दिपाली व अंजली श्रीपत राठोड यांनी सिमेंटच्या जंगलात थेट चौथ्या मजल्यावर वसंतराव नाईक परसबाग फुलविली असून सत्तर पेक्षा जास्त वेगवेगळ्यां पिकांचे उत्पादन घेत असून घरच्या घरी लागणारा भाजीपाला तेही जैविक पद्धतीने घेवून सर्वांसाठी एक आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. आज पर्यंत अनेक मान्यवरांनी त्यांच्या परसबागेला भेट दिलेले आहे.

भारतातील प्रसिद्ध कृषि शास्त्रज्ञ आणि परभणी कृषि विद्यापिठाचे माजी कुलगुरु, ऍग्रो व्हिजनचे मुख्य सल्लागार डॉ.सी.डी. मायी यांनी दिपाली व अंजली श्रीपत राठोड यांच्या परसबाग निर्मिती प्रकल्पास प्रत्यक्ष भेट दिली व त्यांचे प्रयोग घरांघरांत पोहोचावे या उद्देशाने भारतातील सर्वात मोठया ऍग्रो व्हिजन कार्यकर्मात दिपाली व अंजली श्रीपत राठोड यांना संधी दिली.

ता.25 नोव्हें.2023 रोजी दुपारी 2 च्या सत्रात घरोघरी परसबाग : एक आरोग्यदायी उपक्रम., या विषयांवर प्रत्यक्ष केलेले प्रयोग, आलेले अनुभव आणि अभ्यासात्मक सादरीकरणातून दिपाली व अंजली श्रीपत राठोड यांनी सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीपत राठोड यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.सी.डी. मायी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून दिपाली व अंजली श्रीपत राठोड यांचे सन्मान करण्यात आले. सदर कार्यक्रमाला डॉ.सी.डी. मायी हे पूर्णवेळ होते हे विशेष.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये