Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संविधान दिन ते गणतंत्र दिन…पर्यंत ऍड दीपक चटप यांच्या नेतृत्वाखाली निघणार शिक्षण यात्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

     जागतिक स्पर्धेचा दृष्टीकोन विद्यार्थ्यांत रुजविणे गरजेचे आहे. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात शिकून योगदान द्यावे, त्यासाठी संधी व आव्हाने याबाबत पुरेसी माहिती व अपेक्षित मार्गदर्शन गरजेचे आहे. ऍड,दीपक चटप नुकतेच ब्रिटिश सरकारची जागतिक प्रतिष्ठेची चेव्हनिंग शिष्यवृत्ती मिळवून लंडन येथील सोएस विद्यापिठात कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले आहे, लंडनमध्ये शिकत असताना आंतरराष्ट्रीय संस्थांत दिलेल्या योगदानासाठी ब्रिटिश सरकारच्या फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलेपमेंट विभागाने १६८ देशातून आलेल्या स्कॉलर्समधून ‘चेव्हनिंग गोल्ड व्हॉलंटरिंग’ पुरस्काराने सन्मानित केले.

जिल्हा परिषद शाळा ते लंडनच्या विद्यापीठापर्यंतचा प्रवास आव्हानात्मक व अनुभव समृद्ध करणारा ठरला. साधारण १०० वर्षांपूर्वी लंडन येथे शिकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्या निवासस्थानी वास्तव्य होते त्या निवासस्थानी एका फोटोने माझे लक्ष वेधले. त्यात डॉ. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनातून उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी चमूसोबत बाबासाहेब होते. त्यातुन सकारात्मक प्रेरणा घेत माझ्या उच्च शिक्षणाचा फायदा तळागळातील विद्यार्थ्यांना व्हावा, या हेतूने मी शिक्षण यात्रा काढण्याचा संकल्प केला आहे. साधारण ३० हजार विद्यार्थ्यांपर्यंत दोन महिन्यात पोहोचण्याचे नियोजन आहे.

त्यातून चंद्रपुर-गडचिरोली-यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आकांशा बळावतील. माझ्यासोबत पूर्णवेळ मोठ्या भावासारखा असलेला मित्र, कवी, मुक्तपत्रकार अविनाश पोईनकर हा देखील सहभागी होत असून यात्रेच्या समन्वयाची भूमिका पार पाडणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग तथा विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले आहेत.

या शिक्षण यात्रेचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होईल यात शंका नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये