ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माहास्वामित्व योजनेअंतर्गत चिरादेवी येथे गावठाण ( GT ) चे काम पूर्ण

ग्रामपंचायत चिरादेवी व उप.अधिक्षक भूमीअभिलेख भद्रावतीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

माहास्वामित्व योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामपंचायतींच्या जमिनींचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते. आणि ते पहिल्यांदाच झाले आहे. त्यामुळे ब्रिटिश काळापासून ग्रामपंचायत मालकीच्या गावठाण जमिनींचे सर्वेक्षण झालेले नव्हते. या सर्वेक्षणामुळे गावठाणातील किती जमिनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या आहेत व नागरिकांनी त्यावर घरे बांधली, हे स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर ग्रामस्थांना त्यांच्या जागेचा ‘सातबारा उताराही देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या गावठाण जमिनींवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. अनेकांनी पक्की घरे बांधून घेतली. ग्रामपंचायतीला करही दिला जातो. तरीही गावठाण जमिनींवरील अतिक्रमणाचा प्रश्न कायमच आहे. यामुळे “ड्रोन’द्वारे प्रत्येक जिल्हानिहाय ग्रामपंचायतीच्या गावठाणाचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या गावठाण जागांची मोजणी झाली आहे. तत्पूर्वी ग्रामपंचायततर्फे पिवळे पट्टे मारण्यास आले होते. ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत गावठाण जागेवर नागरिकांनी घरे बांधून घेऊन नियमित केली आहेत, त्यानंतर “ड्रोन’द्वारे प्रत्येक घर, मोकळ्या जागांची मोजणी व नकाशे काढले आहे. मोकळ्या जागेवरील अतिक्रमणाची मोजणीही “ड्रोन’द्वारे झाली असून. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गावठाण जमिनीचा “सातबारा’ उतारा तयार करण्यात येणार आहे.

त्याच अनुशंगाने ग्रामपंचायत चिरादेवी व उप – अधिक्षक भूमीअभिलेख भद्रावती यांच्या नेतृत्वाखाली चिरादेवी येथे गावठाण GT चे काम नकाशा नुसार जागांची सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये उप अधीक्षक भूमि अभिलेख भद्रावती येथील एस.एन.श्रीखंडे ( शिरस्तेदार, उप अधिक्षक भूमी अभिलेख भद्रावती ) एस.एच.वावरे ( G.I.S Digitizer , उप अधिक्षक भूमी अभिलेख भद्रावती ) यांच्या निदर्शनास गावठाण GT चे काम दि.२२ नोव्हेंबर २०२३ ला पूर्ण करण्यात आले असून या योजने मध्ये गावठाणातील सर्व मिळकतींना मालकी हक्काचा पुरावा (सनद) देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे असे एस. एन. श्रीखंडे यांनी मत व्यक्त केले आहे. यामध्ये चिरादेवी येथील सरपंच निरूपला मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य जया ताई ठाकरे, ग्रा.प. शिपाई राजू खंडाळकर यांनी या कामामध्ये मोलाचे योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये