Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेनेची जिल्हा आढावा बैठक व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न!

बैठकीत विविध विषयांवर चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांचे आदेशाने व किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख यांचे सूचनेनुसार श्री दत्तात्रय जी पैईतवार संपर्कप्रमुख राजुरा, चंद्रपूर, वरोरा विधानसभा क्षेत्र हे चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची जिल्हा आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी मंचकावर उपस्थित नितीनभाऊ मत्ते जिल्हाप्रमुख चंद्रपुर (बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा विधानसभा क्षेत्र), मा.बंडूभाऊ हजारे शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख (राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा क्षेत्र), आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख (बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा विधानसभा क्षेत्र), योगिताताई लांडगे महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रपूर, कल्पनाताई भुसारी उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी, चंद्रपूर तालुकाप्रमुख संतोष पारखी, भरतजी गुप्ता महानगरप्रमुख चंद्रपूर, अरविंद जी धिमान वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, मीनालताई आत्राम माजी अध्यक्ष नगरपरिषद भद्रावती, चंद्रपूर शिवसेनेच्या झुंजार नेत्या प्रतिमाताई ठाकूर यांचे मुख्य उपस्थितीमध्ये तीनही विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये माननीय दत्तात्रय पैईतवार साहेब यांनी शिवसेना पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या प्रत्यक्ष माझ्यासमोर मांडून त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन व चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू असे सांगितले.

यावेळी बोलताना नितीन मते यांनी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे असलेलं कार्याची माहिती दिली व दत्तात्रय पैईतवार साहेब यांना विनंती केली की आपल्या मित्र पक्षाशी समन्वय साधून शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा . त्याच प्रमाणे बंडूभाऊ हजारे यांनी आपण सरकार मध्ये असूनही शिवसेनेला बरोबरीचा वाटा मिळत नाही अशी खंत व्यक्त केली. योगिताताई लांडगे यांनी महिलांच्या समस्या विषयी मार्गदर्शन केले . आशिष ठेंगणे यांनी शिवसैनिकांच्या अडीअडचणी शिवसैनिकांना होत असलेल्या अडचणी बद्दल आपल्या प्रास्ताविकात माहिती दिली.

यावेळी शिवसेना चंद्रपूर तालुकाप्रमुख संतोष भाऊ पारखी यांचे नेतृत्वात माननीय नितीन भाऊ मत्ते यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून व मार्गदर्शनात सूचक दखने यांचा प्रवेश करुन चंद्रपुर उपशहर प्रमुखपदी नियुक्ति आणि गुरु मेश्राम यांचा प्रवेश करुन चंद्रपुर उपतालुका प्रमुखपदी नियुक्ति करुन अनेकांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे वरोरा तालुका प्रमुख श्रीकांत जी खंगार, वरोरा शहर प्रमुख राजेश भाऊ डांगे, मनीषाताई लोणंगाडगे तालुकाप्रमुख महिला आघाडी वरोरा,भद्रावती शहर प्रमुख पप्पू भाऊ सरवण, चेतन घोरपडे उप शहर प्रमुख भद्रावती, मनिष बूच्चे उपशहरप्रमुख, नाना दूर्गे माजी नगरसेवक, भद्रावती शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सिंगल दीप पेंदाम, भद्रावती महिला तालुका प्रमुख सौ ज्योतीताई लांडगे, भद्रावती महिला शहर प्रमुख तृप्ती ताई हिरादेवे, उषाताई आमटे, चंद्रपुर तालुका संघटक संजयकुमार शिंदे, चंद्रपूर उपतालुकाप्रमुख अविनाश उके, बंडूभाऊ पानपटे, श्री खुशाल सूर्यवंशी शहर प्रमुख राजुरा, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये