Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्राहक जागरण व प्रबोधनाचे ५० वर्षे 

चांदा ब्लास्ट

 अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२३ मध्ये साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने विदर्भ प्रांताचा उद्घाटन समारोह रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी देवी अहिल्या मंदिर सभागृह, धंतोली नागपूर येथे आयोजित आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतची स्थापना सप्टेंबर १९७४ रोजी देशपातळीवर झाली.

पाहता- पाहता या चळवळीने ग्राहकाची दशा व दिशा बदलवली.

भारतीय कामगार चळवळीतील दिशादर्शक नेता आदरणीय दत्तोपंत ठेंगडी यांच्या विशेष मार्गदर्शनात आदरणीय बिंदुमाधव जोशी, आदरणीय राजाभाऊ पोफळी यांच्यासारख्या धुरंधर व्यक्तींनी एकत्र येऊन ग्राहक चळवळीला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त करून दिले.

  ग्राहक पंचायत चार घटकांवर अवलंबून आहे. ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन,रचनात्मक कार्य, आणि संघर्षात्मक कार्यक्रम.

   ग्राहक पंचायत स्थापनेमागचा मूळ उद्देश ग्राहकांना स्वतःच्या

अधिकारासंबधी जागृक करणे, योग्य दरात चांगल्या दर्जाची,चांगल्या गुणवत्तेची वस्तू मिळणे, विक्रेत्याकडून वस्तू घेतल्यानंतर त्याची योग्य सेवा चांगल्या वर्तणुकीसह देणे.

  अखिल भारतीय ग्राहक पंचायत स्थापन होण्यापूर्वी राज्यात विविध ग्राहक संघटना कार्यरत होत्या.त्यांना एकत्रित आणून देशपातळीवर एकसंघ ग्राहक संघटना स्थापन करण्यात आली होती.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अथक प्रयत्नानेच १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला.त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने ग्राहक कल्याण उच्चाधिकार समिती स्थापन केली.

  ग्राहक पंचायतमूळेच भारतीय अर्थव्यवस्थेत ग्राहक ही शक्ती अस्तित्वात आली.

  अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे ब्रीद वाक्य’ ग्राहक एवं राजा ‘म्हणजेच ‘ग्राहक हाच राजा’ हे आहे.

 ‘राष्ट्र देवो भव’ यानुसार ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते गावपातळी पासून देशपातळी पर्यंत तन-मन-धनाने व समर्पित भावनेने कार्य करीत असून ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करीत आहे.

  गरुड हा ग्राहक पंचायतचा लोगो असून कॉपी राईट ॲक्ट नुसार कोणीही ग्राहक पंचायतचे नावाचा व चिन्हाचा वापर करू शकत नाही.

 अखिल भारतीय ग्राहक पंचायतने पुढील बाबीला महत्व दिले आहे.

शोषण मुक्त समाज निर्माण करणे, अर्थव्यवस्थेवर सामाजिक नियंत्रण,व्यवस्था सुधारणा चळवळ.ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून सामूहिक खरेदी वितरण, ग्राहक सहकारी भांडारे इ.ग्राहकहित रक्षणगट तयार होऊ लागले.

भारतीय सहकारी चळवळ व ग्राहक चळवळ यांची विस्तृत कल्पना समोर आली.जागतिक ग्राहक चळवळ, भारतीय समाजरचनेत ग्राहक चळवळीचा असलेला विचार, सद्यस्थितीत ग्राहक हित रक्षणासाठी असणारे कायदे व व्यवस्था आणि ग्राहक चळवळ यासाठी प्रबोधन झालेत.

‘उठता आपण,पडती विघ्ने’ या उक्तीप्रमाणे

ग्राहकांप्रती जागृक असलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत चळवळीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या रूपाने ग्राहक चळवळ उभी करतांना आदरणीय बिंदू माधव जोशी, आदरणीय बापूसाहेब महाशब्दे , आदरणीय राजाभाऊ पोफळी आदींनी केलेल्या अथक परिश्रमाला या निमित्ताने वंदन करून भविष्यात ग्राहक चळवळ लोकाभिमुख होण्याचे दृष्टीने सुवर्ण महोत्सवी अधिवेशन दिशादर्शक ठरेल.हे निश्चित.

        ‌‌ ‌

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये