ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेठ वार्डातील 58 वर्षाची कुस्त्यांच्या दंगलीची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर जय बजरंग व्यायाम मंडळ आणि श्री.गुरुदेव सेवा मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने भव्य पुरुषांच्या दंगलीचे पेठ वार्ड ब्रम्हपुरी येथे आयोजन करण्यात आले होते. सलग ५८ वर्ष या मंडळाच्या वतीने कोविड मधील एक वर्ष वगळता कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात येत आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्षनेता तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते दीपकभाऊ उराडे उपस्थित होते.

व्यासपीठावर खेमराज तिडके अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी, प्रभाकरजी सेलोकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रम्हपुरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृष्णाभाऊ सहारे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर, नियोजन सभापती तथा नगरसेवक महेशभाऊभर्रे, अँड. हेमंत उरकुडे,न.प.माजी उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बंटीभाऊ श्रीवास्तव, बांधकाम सभापती विलास विखार,सोनुभाऊ नाकतोडे अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी, अनंताजी उरकुडे, सुमित सुमित भाई , माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोंढे, सिद्धेश भर्रे,विजयजी बगमारे, सुभाषजी उपासे, मधुकरजी राऊत, व अन्य म मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी विरोध पक्षनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपण सुद्धा 40 किलो वजन गटात विभागीय स्तरावर कुस्ती खेळण्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे आखाड्याची माती जोपर्यंत अंगात लागत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने पैलवान होता येत नाही तसेच आज या धकाधकीच्या तंत्रज्ञानाच्या युगात शारीरिक सुदृढता ठेवण्याच्या दृष्टीने कुस्ती या खेळाचे महत्व सांगितले. या प्रसंगी मान्यवरानी कुस्त्यांची दंगली गावागावात झाल्या पाहिजेत .त्यामुळे पहेलवान तयार होतील असे मार्गदर्शन केले.तसेच दि. 17, 18 व 19 डिसेंबर 2023 ला महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेचा आयोजन ब्रह्मपुरी येथे करण्यात येत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीपभाऊ राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन भास्कर उरकुडे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. गुरुदेव सेवा मंडळ तसेच जय बजरंग व्यायाम मंडळ मंडळच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला या दंगलीमध्ये भिवापूर, उमरेड मसली, गडचिरोली,कुरझा आणि ब्रह्मपुरी येथील महिला कुस्ती पटू तसेच पुरुष कुस्तीपटू यांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती.कुस्त्यांच्या दंगलीचा आनंद घेण्याकरीता प्रेक्षकांची सुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये