ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवेगाव पांडवची मंडई यंदा पंचक्रोशीत गाजली

विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षवेधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

 परंपरागत मंडई उत्सवातील् दंधार,तमाशाला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्याचे लोकजागर करणारे भरगच्च रंगीबेरंगी कार्यक्रम आयोजित करून नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथील हनुमान देवस्थान नी पंचक्रोशी गाजविली.दरवषिंप्रमाणे यंदाही भाऊबिजेला या मंडईतून विद्यार्थ्यांच्या सहभागाने हजारो रसिकांच्या उपस्थीतीत “दीपोत्सव” साजरा झाला.

नवेगाव येथील मंडई तशीही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ग्रामीण संस्कृती जपताना वेगवेगळे सांस्कृतीक सादरीकरण करून तालुक्यातील जनतेचे मनोरंजन व लोकजागर करुन दिवाळी गोड करणाऱ्या या देवस्थानने यंदा नेवजाबाई हितकारिणी विदया लय,धर्मराव कन्या विद्यालय,जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या विदयार्थ्यांना आमंत्रित,सहभागी करून परिसरातील हजारो नागरिकांना रिझवीले. महिनाभरापासूनच या तिन्ही शाळांनी विदयार्थी, विदयार्थीनींना लोकजागर व मनोरंजन करणाऱ्या रंगीबेरंगी सांस्कृतीक तालीम देऊन तरबेज केले हे विशेष.

नवेगाव पांडव येथील मंडळ ला शंभर वर्षाचा इतिहास आहे.या निमित्याने मिनी जत्रेचे आयोजन सुद्धा करण्यात येत असते. आबालवुद्ध,युवा युवती मोठया संख्येने उपस्थित होऊन मंडईतून समाधानी होऊन आनंदाने घरी परततात. गत २ वर्षाआधी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी युवयुवतींना पाचारण करून,सादरीकरण करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले होते. परंपरागत दंधार,तमाशा अस्ताला जात असताना,संस्कृतीचे बदलते स्वरूप ओळखून यंदा मात्र नवेगाव देवस्थान ने शालेय विद्यार्थ्याचे लोकजागर करणारे सादरीकरण करून पंचक्रोशी गाजविली. या निमीत्याने शालेय विद्यार्थ्याना सांस्कृतीक व्यासपिठ उपलब्ध झाले आहे.

देवस्थान कमेटी सोबतच ने.हि.विदया.चे मुख्याध्यापक नरेंन्द्र् चुऱ्हे,धर्मराव कन्या विद्या.च्या मुख्याध्यापिका पपीता चावरे यांच्या कल्पकतेचे व सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संस्कृतिक वारसा जपण्यासाठी विदयार्थाचे योगदान हवे –  प्रा.महेश पानसे.

पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या नवेगांव पांडव येथील मंडई चे उदघाटन राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक तथा माजी मुख्याध्यापक बन्सीलालजी चुऱ्हे हे होते.

या प्रसंगी बोलताना प्रा.महेश पानसे यांनी सास्कुतीक वारसा जोपासण्याकरीता विदयार्थी यांचे योगदान महत्वाचे ठरणार असल्याचे विषद केले.मंडईच्या व्यासपिठावरून शालेय विद्यार्थ्याचे सादरीकरण होणे ही काळाची व ग्रामीण संस्कृतिची गरज असून यातून आपल्या गौरवांकित सांस्कृतीचे जतन करण्यात सवौत्तम साधना होणार आहे.

यावेळी मुख्याध्यापक नरेंन्द्र् चुऱ्हे, पपिता चावरे,माजी प.स.सदस्य संतोष रडके. शिवसेना तालुकाध्यक्ष बंडूजी पांडव,देवस्थान चे पदाधिकारी, शिक्षक टेमदेव नवघडे,दिवाकर नवघडे, दिनेश पानसे,गिरीष नवघडे, व ग्राम पंचायत पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये