ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयुर्वेदात निरोगी जीवनाचे मंत्र – आ. किशोर जोरगेवार

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयुर्वेद चिकित्सा व मागर्दशन शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट

आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापूर्वीपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा लाभली आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढवण्यावर भर दिला जातो. एकंदरित पाहाता आयुर्वेदात निरोगी जिवनाचा मंत्र दडला असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व घन्वंतरी जयंती निमित्त सवारी बंगला येथे नि:शुल्क वातरोग, पंचकर्मा चिकित्सा आणि आयुर्वेदीय चिकित्सा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. राजु टालेवार, डॉ. जितेंद्र खोब्रागडे, डॉ. सुधिर मत्ते, डॉ. दीपक भट्टाचार्य, डॉ. अमित कोलटकर, डॉ. सिमला गर्जलवार, डॉ. रुपाली उत्तरवार, योगेश निकोडे, डॉ. डांगेवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

  यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, धडपडीच्या जिवणात नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने भविष्यात आरोग्याबाबत मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. महिलांनी विशेष: आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण मतदार संघात विविध विकासकामे करत आहोत. मात्र केवळ या विकासकांमुळे माझे समाधान होत नाही. या कामांसोबत आपण मतदार संघात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहोत. यात आरोग्य शिबिरांवर आपला अधिक भर आहे. महापालिकेला मोठा निधी देत आपण शहरातील विविध भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. यात जवळपास दिडशेहुन अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

  नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे आयोजन उत्तम आहे. ही एक सेवा आहे. आयुर्वेदीक पध्दतीने आपण उपचार करणार आहात. त्यामुळे याचा नक्कीचा मोठा फायदा नागरिकांना असे आयोजन नियमित झाले पाहिजे. यात लोकप्रतिनीधी म्हणून आमचे नेहमी सहकार्य राहील अशी ग्याही या प्रसंगी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. या कार्यक्राला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये