Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या मंत्रमुग्ध करणारा बहारदार दिवाळी पहाट

द्वीप प्रज्वलनाने व गजानना श्री गणराया या सामूहिक गणेश वंदनेने कार्यक्रमाची प्रसन्न सुरूवात

चांदा ब्लास्ट

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचा हौशी कलावंतांनी सादर केलेला बहारदार दिवाळी पहाट कार्यक्रम एन.डी.हॉटेल येथे ११ नोव्हेंबर रोजी पडला. द्वीप प्रज्वलनाने व गजानना श्री गणराया या सामूहिक गणेश वंदनेने कार्यक्रमाची प्रसन्न सुरूवात झाली. त्यानंतर सियाराम सियाराम जय जय राम – करबाडे

सुरज की गर्मी से तपते हुये तन को मिल जाये… दिनेश चौधरी, सुखके सब साथी दुख मे ना कोई- डॉ अशोक वासलवार, जब दीप जले आणा जब शाम ढले – ॲड. विनायक बापट यांनी गित सादर केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष अनुप यादव यांनी शिरडी वाले साई बाबा आय हैं तेरे हे गित सादर केले.

यावेळी अशोक हासानी व संच अक्षरश: साईबाबाच्या रूपात सभागृहात अवतरले होते.शुक्र तारा मंद वारा.. सचिन गांगरेड्डीवार, अधीर मन झाले डॉ. सिमला गाजरलावार, छुकर मेरे मन को…. अनुप पोरेड्डीवार, मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते गं… किर्ती चांदे यांनी सादर केले. त्यानंतर मधुमास नृत्याविष्कार महिला सदस्यांनी सादर केला. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी – वैशाली रेशिमवाले, अखियोंके झरोके से.. रीचा भामरी, मी आहे कोळी…… उत्तम डाखरे, ये मोह मोह के धागे .. शिवानी बदखल, आली ठुमकत नार…. डॉ राम भारत, पल भर मे ये क्या हो गया… वृषाली डेकाटे, आज कल कूछ याद रहता नही… विजय बदखल, चलते चलते मेरे ये गीत – संजय अग्रवाल, तू इस तराह से मेरी जिंदगी में शामिल हो-राजेश गण्यारपवार, ये समा समा हैं ये प्यार का… ज्योती रामटेके अशी एकाहून एक मधुर गित गायकांनी सादर केली. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा…. ही मनिषा पडगीलवार यांनी लावणी सादर केली. जयोस्तुते या सामुहिक स्वातंत्र्य गिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे बहारदार संचालन मनिष बोराडे व अल्का ठाकरे यांनी केले. संगीत संयोजन बहाद्दुर हजारे यांनी केले. तर रंगमंच सजावट रोहीत गाडगे व संचाने केली. स्वादिष्ट फराळाने कार्यक्रमाची सांगता झाली. दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर मनिष बोराडे, अल्का ठाकरे, वृषाली डेकाटे व मनिषा पडगेलवार, अशोक हासानी होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष अनुप यादव, सचिव कुंजबिहारी परमार तथा सर्व माजी अध्यक्षांचे मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये