ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर ज्ञानेश्वर डुकरे यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडून ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात भद्रावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर डुकरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची तरतूद करण्यात आली आहे.

त्यानुसार निवड समितीमार्फत जिल्हा संरक्षण परिषदेवर जिल्ह्यातील एकूण 17 सदस्यांची निवड करण्यात आली असून त्यात भद्रावती येथील ज्ञानेश्वर डुकरे यांचा समावेश आहे.समाजसेवा हा माझा पिंड असुन विविध क्षेत्रातील नागरिकांना न्याय देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. जिल्हा संरक्षण परिषदेवर माझी निवड करण्यात आली याची जबाबदारी ओळखुन मी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन असे मत डुकरे यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्हा संरक्षण परिषदेवर निवड झाल्याबद्दल तालुक्यात डुकरे यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

 समाजसेवा माझा पिंड असून विविध क्षेत्रातील नागरिकांना न्याय देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो या संरक्षण परिषदेवर माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. याची जबाबदारी ओळखून मी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन.

 ज्ञानेश्वर डुकरे

भद्रावती. कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये