वरोरा शहरातील क्रीडा समस्या सोडवण्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आश्वासन
यावेळी त्यांनी वरोरा तालुका क्रीडा संकुलातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला

चांदा ब्लास्ट
वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा चे पदाधिकारी व खेळाडू वरोरा शहरातील क्रीडा समस्या बाबत निवेदन घेऊन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या भेटीस आले होते. यावेळी त्यांनी वरोरा तालुका क्रीडा संकुलातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. याप्रसंगी वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा चे अध्यक्ष गजानन जीवतोडे, कार्याध्यक्ष किशोर पिरके, सुनील बांगडे, निखिल बोबडे, विनोद उंमरे, दुष्यंत लांडगे, व वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोरा चे खेळाडू उपस्थित होते.
या निवेदनात त्यांनी क्रीडा संकुलातील मैदानांची अवस्था, शौचालयांच्या अभावामुळे खेळाडूंना होणाऱ्या त्रास, क्रीडा संकुलात क्रीडा साहित्याचा अभाव, क्रीडा स्पर्धांचे आयोजन न होणे यासारख्या समस्यांवर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे लक्ष वेधले. या निवेदनावर प्रतिक्रिया देताना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी क्रीडा क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. त्यांनी लवकरच वरोरा तालुका क्रीडा संकुलाला भेट देऊन समस्यांची पाहणी करणार असल्याचे सांगितले. या वेळी वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा चे पदाधिकारी तसेच विविध क्रीडा प्रकारांचे खेळाडू उपस्थित होते.