Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देववाणी दिव्यांग बहूउद्देशीय संस्थेच्या दिवाळी पहाट

कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

चांदा ब्लास्ट

देववाणी दिव्यांग बहूउद्देशीय संस्था चंद्रपूर च्या वतीने दि. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर चंद्रपूरातील आझाद बागेत दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सकाळी साडे पाच वाजता या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. चंद्रपूरच्या गंधर्व mitra परिवार या सांगितिक समूहाच्या माध्यमातून सुमधुर मैफिल सजविण्यात आली. तसेच स्थानिक कलावंत मंडळी देखील गीत, नृत्य सादर करत यात सहभागी झाली होती.

अवनी शिंगरू या बाल नृत्यांगनेने गणेश वंदना नृत्याच्या माध्यमातून सादर करत दिवाळी पहाट कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर ओंकार प्रधान रूप गणेशाचे या गीताच्या माध्यमातून मैफिल पुढे गेली.

या कार्यक्रमात दर्जेदार नृत्यांनी रंग भरला. मेघा मेश्राम खान यांनी सादर केलेली चंद्रमुखी या चित्रपटातील लावणी उपस्थितांची दाद मिळवून गेली. रोहिणी उईके, शालिनी ठाकरे, नमिता दाभेरे, मनीषा पडगीलवार, गणेश झाडे आदींनी गायलेली सुरेख गाणी रसिकांच्या पसंतीस उतरली. गंधर्व परिवारातील सौ दीक्षा कामतकर आणि विजय पारखी  यांनी विविध गीते गात मैफिल अधिक सुमधुर केली. विशेष बालक असलेला तबला वादक देवांशु शिंगरू याचा तबलाआणि त्याची आजी श्रीमती ज्योती पारधी यांचे गाणे बहारदार ठरले. देवांशु चे तबलावादन लक्षवेधी ठरले.

हिमा सहारे यांनी सादर केलेली लावणी आणि छवी उईके, पिहू घाटे, झिल अलोणे या बालिकांनी  सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांनी मनापासून दाद दिली.  नृत्य प्रशिक्षक जावेद सर यांच्या चमूने नृत्य सादर केले.

बबिता उईके आणि राकेश शिंगरू यांनी सादर केलेल्या युगल नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे बहारदार संचालन अमोल कडुकर यांनी केले. गंधर्व मित्र परिवाराचे रोहित गाडगे, प्रवीण ढगे, सोहन कामतवार यांनी विशेष परिश्रम घेत मैफिलीला उंची बहाल केली.

देववाणी दिव्यांग बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मेघना शिंगरू,सुशील सहारे,शालिनी ठाकरे,स्मिता रेभणकर,अजय धवने,  अंकुश राजूरकर, नूतन धवने, अविनाश चव्हाटे, सागर अंदनकर, वैभव दाभेरे  आदींनी अथक परीश्रम घेतले.कार्यक्रमाला डॉ. नरेंद्र कोलते, डॉ प्रेरणा कोलते, उद्धवराव बोनगीरवार, रंगकर्मी  दिगम्बर इंगळे आदी गणमान्य नागरिकांसह रसिक प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये