Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती तर्फे दिवाळीच्या प्रकाश पर्वावर दिवाळी पहाट ‘सूर तेच छेडीता’ कार्यक्रमाचे आयोजन

भल्या पहाटे दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त सुमधुर निवडक मराठी - हिंदी गीतांची श्रवणीय कलाकारांनी जमविली मैफिल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या प्रागणात भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती तर्फे दीपोत्सवाचे आनंददायी पर्वावर दिवाळी पहाट “सूर तेच छेडीता” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती नीलिमाताई शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुषमाताई शिंदे, डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, प्राध्यापक डॉ. कार्तिक शिंदे, डॉ वैभव शिंदे, श्री धनराज अस्वले यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्याकडे दिवाळी हा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. तो सण सर्वांसोबत साजरा व्हावा तसेच रात्रीची संस्कृती नष्ट व्हावी या संकल्पनेतून डॉ विवेक शिंदे यांनी भल्या पहाटे दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना डॉ विवेक शिंदे यांनी या कार्यक्रम भद्रावतीच्या इतिहासात दिवाळी निमित्त भल्या पहाटे होण्याचे कार्यक्रमाचे द्वितीय वर्ष असून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही देत उपस्थित सर्व गायक कलाकारांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सदर कलाकारांनी सुमधुर निवडक मराठी – हिंदी गीतांची श्रवणीय महफिल् सादर करण्यात आली यामध्ये गायक प्राध्यापक विवेक सरपटवार, गायिका सौ वैदेही सरपटवार, आशुतोष सरपटवार, तबलावादक बालाजी ताडे, गिटार वादक संतोष रामटेके, गायक मनोज कृष्णन, प्राध्यापक डॉक्टर राजेश हजारे यांनी गीत सादर केले.

याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव प्राध्यापक डॉक्टर कार्तिक शिंदे व निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके सर यांच्या हस्ते करण्यात आले.

हा कार्यक्रम भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे सर, सचिव डॉक्टर कार्तिक शिंदे सर, डॉक्टर वैभव शिंदे सर, डॉक्टर बांदुरकर, प्राचार्य डॉक्टर डॉक्टर एल. एस. लडके, डॉक्टर अनिल शिंदे,  वर्मा पीएसआय, भद्रावती, बंग साहेब, दिलीप शिंदे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाकरिता भद्रावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत सर्व शाळा व महाविद्यालय चे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक व प्राचार्य व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक डॉक्टर सुधीर मोते व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. कार्तिक शिंदे यांनी केले.

या काय हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्राध्यापक डॉक्टर सुधीर मोते, प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र बेदरे, प्रा डॉ. शित्रे, प्राध्यापक कुलदीप भोंगळे, प्राध्यापक संदीप प्रधान, अजय आसुटकर, भावरकर, मानकर,  तेलंग व  आखतकर यांनी अथक परिश्रम केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये