ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कॉष्ट्राईब परिवाराच्या वतीने ग्रंथभेट व भोजनदान संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

बुद्ध टेकडीच्या वर्धापन दिनानिमित्य कॉष्ट्राईब परिवार मुल च्या सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीने ग्रंथभेट व भोजनदानाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आला होता.

   सदर कार्यक्रमात डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम वाचनालय चिचाळा या ग्रंथालयाला विविध थोर पुरुषाचे चरित्र व स्पर्धापरीक्षा यांची पुस्तकं संघटनेच्या वतीने ग्रंथभेट म्हणून देण्यात आली.

   उदघाटनाच्या कार्यकनंतर विद्या कोसे व संच यांचा ‘चलो बुद्ध की और’ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.त्यात अनेक कर्मचारी बंधू भगिनी,विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली गाणी सादर केली.

सायंकाळी ४ वा. बुद्ध टेकडीवर आलेल्या सर्व उपासकांसाठी भोजनदान सुरू करण्यात आले.

   सदर कार्यक्रमाचे उदघाटक चंद्रपूर चे प्रख्यात युवा उद्योजक मा.प्रफुल्ल खोब्रागडे,अध्यक्ष म्हणून मा.बी.एच. राठोड गटविकास अधिकारी मुल, विशेष अतिथी म्हणून मा.मधुकर वासनिक गटविकास अधिकारी सावली,प्रमुख अतिथी म्हणून मा.अरुण खराते जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, मा.बंडू आकनुरवार,राज्यउपाध्यक्ष, मा.मोरेश्वर बारसागडे जिल्हाध्यक्ष,जगदीप दुधे जिल्हामहासचिव,अशोक राऊत शिक्षक सेल अध्यक्ष, शंकर मसराम जिल्हाकोषाध्यक्ष,उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी ,सुनील निमगडे, रत्नमाला गेडाम,भास्कर रामटेके,डॅनियल देवगडे,विद्या कोसे, बबन दुर्गे,आतिष उराडे, ज्योती निमगडे, चंदा तुरे,संगीता निसरकार, आदेश मानकर,संदेश मानकर,संतोष सिडाम, अनंत दुधे, यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये