ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्काऊट गाईड चारित्र्य संवर्धन करणारी चळवळ – नितेश झाडे

कॅप्टन मोहन गुजरकर यांनी स्काऊट व गाईड चळवळीचा इतिहास या प्रसंगी गोष्टी स्वरूपात सांगितले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘कोणत्याही देशाला समर्पित, शिस्तबद्ध व चारित्र्यवान नागरिकांची नितांत गरज असते. अश्या सुजाण नागरिकांची फळी निर्माण करण्याकरीता त्यांच्या शाळा-महाविदयालयीन जीवनातच चांगली संस्कार रुजविण्यात आली पाहिजे. या दृष्टिकोनातून भारत स्काऊट व गाईड चारित्र्य संवर्धन करणारी फार मोठी चळवळ आहे, असे प्रतिपादन स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील रोव्हर व रेंजर पथकातर्फे आयोजित भारत स्काऊट व गाईड च्या 74 व्या ‘स्थापना दिना’निमित्त महाविद्यालयातील ‘स्काऊट भवनात’ जिल्हा संघटन आयुक्त नितेश झाडे यांनी 7 नोव्हेंबर रोजी केले.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी रोव्हर स्काऊट चे जिल्हा आयुक्त तथा रोव्हर लिडर कॅप्टन मोहन गुजरकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटक नितेश झाडे, रोव्हर लिडर संतोष तुरक, सहाय्यक रोव्हर लिडर योगेश आदमने व आसीफ शेख उपस्थित होते.

स्काऊट गाईड स्थापना दिवसाची सुरुवात ध्वजारोहण सोहळ्याने झाली. स्काऊट गाईड चळवळीतून जनक लाॅर्ड बेडन पावेल यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र प्रदान करून रोव्हर्स-रेंजर्सना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार रेंजर राखी खोडे, अक्षय जबडे व शेखर भोगेकर यांच्या गटाला तर द्वितीय पुरस्कार रेंजर मनिषा मडकाम, कोमल शितळे व आदित्य तामगाडगे यांच्या गटाने पटकावला. यावेळी स्काऊट व रेंजर ध्वज निधी तिकीटांचे अनावरण करण्यात आले.

कॅप्टन मोहन गुजरकर यांनी स्काऊट व गाईड चळवळीचा इतिहास या प्रसंगी गोष्टी स्वरूपात सांगून चळवळीचे व्यक्तिमत्त्व विकासात महत्व विषद केले. रोव्हर साहील रामगडे व रेंजर ईश्वरी परचाके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संचालन रेंजर वैष्णवी शिरभाते व साक्षी येळणे यांनी तर आभार रेंजर नैना गवळी हिने मानले. यशस्वीतेकरीता रोव्हर्स व रेंजर्स नी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये