ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्काऊट गाईड ध्वज निधी तिकीटाचे अनावरण

दीपावली सुट्टी नंतर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व शिबिरांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा: भारत स्काऊट व गाईड च्या 74 व्या ‘स्थापना दिना’निमित्त ‘ध्वज निधी तिकीटांचे अनावरण प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा स्काऊट व गाईड चे जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. मंगेश घोगरे यांच्या शुभहस्ते शिक्षणाधिकारी कार्यालयात 7 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. यावेळी रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर व स्काऊटचे जिल्हा संघटन आयुक्त नितेश झाडे उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्य़ात 250 माध्यमिक शाळा, 200 प्राथमिक शाळा व 25 कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयात स्काऊट गाईड चळवळ सक्रीयपणे सुरू असून यात दहा हजाराच्या वर कब-बुलबुल, स्काऊटस-गाईड्स व रोव्हर्स-रेंजर्स सहभागी आहे. शैक्षणिक क्षेत्रात चारित्र्य संवर्धन करणारी मोठी चळवळ म्हणून स्काऊट गाईड चळवळीकडे पाहिले जाते. भारत स्काऊट व गाईड ध्वज निधी तिकीटांच्या माध्यमातून चळवळीतील विविध शिबिरे व उपक्रमांकरीता आर्थिक निधी उपलब्ध होतो.

जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. मंगेश घोगरे यांनी जिल्ह्यातील सर्व स्काऊटस, गाईड्स व त्यांच्या शिक्षकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या असून दीपावली सुट्टी नंतर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात येईल असे जाहीर केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये