विजासन बुद्ध लेणीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आ. प्रतिभा धानोरकर
बुद्ध लेणी येथे वर्षावास कार्यक्रमाचा समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहर हे ऐतिहासिक शहर असून या शहरात हिंदू, बौद्ध तथा जैन बांधवांचे श्रद्धास्थान आहे. शहरातील ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणी यापैकीच एक असून ही भूमी बौद्ध बांधवांची श्रद्धास्थान आहे. या बुद्ध लेणीच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले .स्थानिक ऐतिहासिक बुद्ध लेणी येथे भव्य धम्म मेळावा, वर्षावास समापन समारोह तथा अभ्यासिका इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.
त्यात त्या बोलत होत्या. यावेळी भदंत धम्मसेन महस्थवीर येनीकोनी,आमदार प्रतिभा धानोरकर, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, महेंद्र गावंडे, लिनता जुनघरे, मिलिंद रायपुरे, सुरज गावंडे, विनयबोधी डोंगरे, जयदेव खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बुद्ध लेणी परिसरात उभारण्यात येत असलेल्या अभ्यासिका इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या अभ्यासिकेच्या इमारतीच्या बांधकामासाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आमदार निधीतून वीस लक्ष रुपये मंजूर करून दिले.
यावेळी भदंत धम्मसेन महस्थवीर येनीकोणी यांनी उपस्थितांना वर्षावासानिमित्त मार्गदर्शन केले व बौद्ध धर्मात वर्षावासाचे असलेले महत्त्व विषद केले. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर तथा इतर मान्यवरांनी सुद्धा आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनयबोधी डोंगरे यांनी,संचालन जयदेव खाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रियवंद वाघमारे यांनी केले.सदर कार्यक्रमाला शहरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.