Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

संत झिंगुजी मठातून श्री संत झिंगुजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

          शहरातील श्री संत झिंगुजी मठातून दिनांक ९ रोज सोमवारला दुपारी तीन वाजता श्री संत झिंगुजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेनंतर गोपालकाल्याचे किर्तन पार पडले, त्यानंतर महाप्रसादाच्या वितरणानंतर मठात तीन दिवसापासून सुरू असलेला श्री संत झिंगुजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता करण्यात आली. सदर शोभा यात्रा मठातून निघाल्यानंतर मुख्य रस्त्याने तथा परिसरातील अंतर्गत रस्त्याने फिरत वाल्मिकी चौकातून परत मठात आल्यानंतर शोभा यात्रेची सांगता करण्यात आली. बँड तथा ढोल ताशांच्या निनादात निघालेल्या या शोभा यात्रेत भजन मंडळे, लेझीम पथक तथा शहरातील महिला व पुरुष भाविक सहभागी झाले होते. महोत्सवाच्या या तीन दिवसात मठात विविध धार्मिक तथा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी श्री संत झिंगुजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

संत झिंगुजी मठात नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन दोनशे रुग्णांनी घेतला लाभ

       श्री संत झिंगुजी महाराज मठात श्री संत झिंगुजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने मठात दिनांक 8 ला नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शहरातील 200 रुग्णांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करून त्यावर उपचार करण्यात आले. या रुग्णांपैकी डोळ्यांच्या रोगाने प्रभावित असलेल्या 50 रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रशांत नागपुरे व डॉक्टर मोनिका प्रशांत नागपुरे यांनी रुग्णांच्या डोळ्याची तपासणी करून रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन केले.

या शिबिराला परिसरातील रुग्णांनी उदंड प्रतिसाद देत आपल्या डोळ्यांची तपासणी केली. सदर नेत्रचिकित्सा शिबिराला यशस्वी करण्यासाठी श्री संत झिंगुजी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये