ताज्या घडामोडी

अंमली पदार्थाची वाहतुक करणारे अट्टल गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

किंमत १९ लाख ८० हजाराचे (मॅफेड्रान) पॉवडर अंमली पदार्थासह २८ लाख २ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट

मा. पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा मार्फत अवैध अंमली पदार्थ दारू, शस्त्रे, जुगार पैसे यांचे विरोधात राबविलेल्या विशेष मोहीमे दरम्यान दिनांक ३०/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय चंद्रपूर येथे उपस्थित असताना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की, दोन इसम खाजगी कारने नागपुर वरून एम. डी. ड्रग्ज पॉवडर विक्री करीता सोबत बाळगुन पडोली चौक येथे येणार आहे. सदर माहिती वरीष्ठांना देवुन सदर माहिती वरून पोलीस स्टेशन पड़ोली हददीत थांबुन असतांना एक चार चाकी वाहन ज्याचा क्रमांक एमएच-३४- बीआर-५९५१ ही नागपुर कडुन चंद्रपूरच्या दिशेने येतांना दिसली.

सदर चारचाकी वाहनास थांबवुन झडती घेतली असता, ड्रायव्हरचे सिटचे बाजुला बसलेला इसम नामे शाहरूख मतलुब खान वय २८ वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस यांचे हातातील थैलीमध्ये पांढऱ्या भुरकट रंगाचे पॉवडर M. D. (मॅफेड्रान) वजन १९८ ग्राम किंमत १९ लाख ८० हजार रू तसेच त्याचे ताब्यातील कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक लोखंडी तलवार किंमत अंदाजे ५००/- रू मिळुन आले.

सदर कार्यवाही दरम्यान दोन्ही आरोपी नामे १) शाहरूख मतलब खान वय २८ वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर २) साहील ईजराइल शेख वय २८ वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर यांचे ताब्यातुन १) १९८ ग्राम एमडी पॉवडर किंमत १९ लाख ८० हजार रू २) दोन नग विव्हो कंपनीची मोबाईल किंमत २० हजार रु ३) एक बलेनो कार एमएच-३४- डीआर-५९५१ किंमत ८ लाख रू ४) आरोपीचे अंग झडतीत नगदी २२०० /- रू 5) एक लोखंडी तलवार किंमत ५००/- रू असा एकुण २८ लाख २ हजार ७०० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर दोन्ही आरोपींनी अटक करून पो. स्टे. पडोली अप. क्र. ३१९ / २०२३ कलम ८ ( क ) २१ (क) गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ सकलम ४, २५ भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये करण्यात आला. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा येथील सपोनि नागेश चतरकर हे करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार सपोनि नागेश चतरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि अतुल कावळे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, भुषण बारसिंगे तसेच पो. स्टे. सायबर चे छगन जांभुळे, अमोल सावे, प्रशांत लारोकर यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये