ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरकारी धोरणाच्या विरोधात तीन दिवस कृषी केंद्र बंद

तालुका कृषी अधिकाऱ्याला दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावित विधेयक क्रमांक ४०, ४१, ४२, ४३ व ४४ मधील जाचक नियमाचा भद्रावती तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन नी विरोध केला आहे या प्रस्तावित कायद्याचा निषेध म्हणून येत्या २ नोव्हेबर ते ४ नोव्हेबरला भद्रावती तालुक्यातील कृषी केंद्र पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तालुका कृषी अधिकाऱ्याला देण्यात आले.

कृषी निविष्ठा विक्री करण्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी शासनाने भूमिका स्वीकारली आहे. सध्या प्रचलित असलेले कायदे पुरेसे असताना राज्य शासनाकडून ४०, ४१, ४२, ४३ व ४४ नुसार पुन्हा नवीन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रेत्यांसाठी अत्यंत जाचक आहे त्यामुळे विक्री व्यवसाय करणे कृषी केंद्र संचालकांना अशक्य प्राप्त आहे कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त कंपनीच्या कृषी निविष्ठा या सीलबंद पॅकिंग मध्ये खरेदी करून येतात त्यानंतर निविष्ठा त्याच अवस्थेत शेतकऱ्यांना विक्री केल्या जातात यात फरक पडल्यास कृषी विक्रेत्यांना दोषी ठरवू नये अशी मागणी कृषी केंद्र संचालकांनी धरून ठेवली आहे.

याबाबतचे निवेदन तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांना तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे देण्यात आले यावेळी अध्यक्ष- किशोर दिवसे, उपाध्यक्ष -श्यामसुंदर उरकुडे, कोषाध्यक्ष -देवा बजारे, सचिव -अमोल पोटे व सदस्य – महेश मत्ते, श्रीकांत टोगे, सचिन जीवने, श्रीकांत कापसे, महेश वांढरे, संतोष खडतकर, राहुल पिदुरकर, निलेश कोमठी, उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये