ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी शहरातील जलतरण तलावासह विविध विकासकामांची केली पाहणी

 चांदा ब्लास्ट

राज्याचे विरोधी पक्षनेता तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मतदारसंघात विकासाचा झंझावात कायम ठेवत विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट केलेला आहे. ब्रम्हपूरी नगरपरिषद क्षेत्र हद्दीत निर्माणाधीन जलतरण तलाव, बगीचा व खुल्या रंगमंचाच्या बांधकामाची त्यांनी आज पाहणी केली.
राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ब्रम्हपूरी शहरात जलतरण तलाव व बगीचा तयार करण्यासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. सदरची विकासकामे प्रगतीपथावर असून आज सदर कामांची राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली. या विकासकामांमुळे शहरातील नागरिकांना तसेच जलतरणपटुंना सोयीसुविधांचा आनंद लवकरात लवकर घेता यावा याकरिता वरील विकासकामे जलदगतीने करण्याचे निर्देश यावेळी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.
याप्रसंगी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती तथा गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चहांदे, न.प. अभियंता आंबोरकर हे उपस्थित होते.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये