Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गवराळा गावठाणातील जमीनीचे ड्रोनद्वारे मोजणी करावी

तसेच, नागरीकांना (पि.आर. कार्ड) आखिवपत्रिका तात्काळ द्यावे - मिनलताई आत्राम

चांदा ब्लास्ट

भद्रावती शहरातील गवराळा वार्ड व तसेच विविध ९ वार्ड मध्ये गावठाण असून येथील नागरिक पिळाणपिळाण पासून १०० वर्षा पेक्षा जास्त कालावधी पासुन येथे राहत असुन सुध्दा येथील नागकरीकांच्या प्रापर्टी, जमीनीची, घरांची कुठे ही नोंद नाही व रेकार्ड सुध्दा नाही त्या मुळे येथील नागरीकांना जमीनीची आखिव पत्रिका मिळत नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळत नाही तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजने पासुन देखील वंचित राहावे लागत असल्याने व मुलांचे जातीचे दाखले काढण्यासाठी पुरावा नसल्याने बनवन भटकत लागत आहे. केंद्र शासन पुरस्कृत स्वामित्व योजनेअंतर्गत घरे आणि जमीनीचे मोजमाप ड्रोनद्वारे करण्यात येणार होते.

जिल्हयातील १५ तालुक्यातील गावठणातील मिळकत धारकांच्या मिळकतीचे मोजमापण करण्यात येणार होते. परंतु भद्रावती शहरातील गावठाणचा मोजमापीला अजुन ही सुरवात झालेली नाही. त्यामुळे या ड्रोनद्वारे कार्यक्रमाद्वारे अचुक व जलदगतीने सर्वेक्षण होणार असुन या द्वारे शासनाच्या मालकीच्या मिळकतीने संरक्षण होणार आहे. या शिवाय नागरीकांच्या नागरी हक्काचे संबर्धन होणार आहे. ड्रोनद्वारे गावठाण मोजणीच्या महत्वकांशी प्रकल्पद्वारे गावातील घरे, रस्ते, शासनाच्या नगर परिषद, च्या खुल्या जागा, नाले यांचे क्षेत्र व सिमा निश्चीत होतील व मिळतीचा नकाशा तयार होईल.

या शिवाय कायदेशीर हक्काचा अधिकार अभिलेख, मिळकत पत्रिका स्वरुपात तयार होणार आहे. या द्वारे नागरीकांनाही विविध फायदे होणार आहेत मिळकत पत्रिका तयार झाल्याने त्या वर कर्ज श्राथक्षक घेणे सुलभ होणार आहे. गावठाण भुमापनाची प्रक्रिया पारदर्शपणे करता येणार आहे. असे उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय येथील अधिका-यांनी सांगीतले. परंतु आर्डनस फॅक्टरी चांदाचे जनरल मॅनेजर यांनी ड्रोन द्वारे मोजणीला विरोध करीत असल्याने गावठाण मोजणीचे काम थंड बस्त्यात पडले आहे.

तरी मा. जिल्हयाचे पालकमंत्री साहेब, व जिल्हाधिकारी साहेब यांनी जातीने लक्ष देवुन मौजा गवराळा गावठाण तसेच भद्रावती शहरातील गावठाणचा सिटी सर्व्हे करुन तात्काळ येथील नागरीकांना जागेची आखिव पत्रिका देण्यात यावे अन्यथा शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा सौ. मिनलताई आत्राम माजी अध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये