ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गौण खनिजची अवैध वाहतूक करणारे 2 टिप्पर जप्त

उपविभागीय अधिकारी यांनी केली कारवाई

चांदा ब्लास्ट

उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांच्या पथकाने अवैध मुरूम वाहतूक करणारे 2 टिप्पर 22 ऑक्टोबर ला जप्त केले असून पुढील दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे.

अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या शोधात निघालेल्या उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांच्या पथकाला अवैध मुरूम वाहतूक करणारे निलेश दादाराव शिरसाठ यांच्या मालकीचे टिप्पर MH 31 FC 6858 आढळले या टिप्पर मध्ये 6 ब्रास मुरूम होते तर दुसरे टिप्पर MH 28 BB 1713 यामध्ये सुद्धा 6 ब्रास मुरूम अवैध रित्या वाहतूक करताना आढळून आले आहेत. दोन्ही टिप्पर पोलीसानी जप्त केले असून पुढील कारवाई सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये