Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चारशे वर्षांची परंपरा असलेल्या बालाजी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा

श्री बालाजी विवाह सोहळा व अभिषेक उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                भद्रावती हि ऐतिहासिक नगरी आहे. या नगरीत अनेक प्राचीन मंदिरे तथा ऐतिहासिक स्थळे आढळून येतात. अशाच एका मंदिरांपैकी चारशे वर्षांपेक्षा जास्त जुने असलेले अति प्राचीन असे बालाजी मंदिर होय. या मंदिरात बालाजी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शहरातील मध्य बाजारात वडाच्या झाडाजवळ चौकात हे अत्यंत प्राचीन असे बालाजी मंदिर आहे.

मंदिराचा व्याप जरी मोठा नसला तरी हे मंदिर अति प्राचीन असल्यामुळे भाविकांमध्ये ते आस्थेचे केंद्र आहे. या मंदिरात साधारणता तीन ते चार फूट असलेल्या काळ्या पाषाणाची श्री बालाजीची मूर्ती अत्यंत आकर्षक अशी आहे. याच मंदिराजवळ एक गणपतीचे मंदिर असुन या दोन मंदिराचा समूह या परिसरात आहे. अनेक वर्ष हे मंदिर दुर्लक्षित होते त्यामुळे या बालाजी मंदिराची कल्पना फार थोड्या भाविकांना होती. हळूहळू या मंदिराकडे परिसरातील व्यापाऱ्यांचे लक्ष गेले. त्यांनी या मंदिराची योग्य ती व्यवस्था केली. शहरातील व्यापारी अमित मद्दीवार हे या मंदिराची कित्येक वर्षांपासून सेवा करीत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मंदिरात बालाजी नवरात्राच्या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

यावर्षी सुद्धा या मंदिरात मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली व नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दिनांक 20 रोज शुक्रवारला मंदिरात श्री बालाजी विवाह सोहळ्याचे व अभिषेकाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अनेक भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. याप्रसंगी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या नवरात्री उत्सवाला यशस्वी करण्यासाठी अमित मद्दिवार, अनंता रोकमवार, चंद्रशेखर म्हस्के, अमित गुंडावार, विशाल नवघरे, अतुल कुचनकर, युवराज खामकर, मुन्ना भोयर, एडवोकेट विजय मत्ते, सुनील गुंडावर आदी व्यापारी वर्ग सहकार्य करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये