Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथील पुर्व प्राथमिक विभागात गरबा व दांडीयाचे आयोजन

सर्व विद्यार्थ्यांनी गरबा व दांडींया करीत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.

चांदा ब्लास्ट

नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात मोठया उत्साहाने साजरा केल्या जातो. नवरात्रात नऊ दिवस देवीची उपासना केली जाते. गरबा व दांडीया शिवाय देवीची उपासना ही अपूर्णच. म्हणूनच चांदा पब्लिक स्कूल येथील पुर्व प्राथमिक विभागाअंतर्गत गरबा व दांडीयाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग गरबा पोशाखात आले होते. दिपप्रज्वलनानंतर लगेच सर्व विद्यार्थ्यांनी गरबा व दांडींया करीत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. मुक्ता बोझावार लाभल्या. शाळेच्या संचालिका श्रीमती. स्मिता संजय जिवतोडे व शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी गरबा पोशाखात आलेल्या चिमुकल्यांसोबत गरबा व दांडिया करीत कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये