Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एमईसीबी चारगाव विभाग कार्यरत लाईनमनची आत्महत्या

पुढील अधिक तपास चालू आहे

चांदा ब्लास्ट

वरोरा तालुक्यातील शेगाव कार्यालय एमईसीबी येथील चारगाव विभाग अंतर्गत कमलेश नामदेव मुंडरे वय ३६ लाईनमन पदावर असुन पंखाला लटकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

शेगाव येथील यशोदा नगरीत भाड्याने राहत असलेल्या दडमल यांच्या घरी चारगाव विभाग बुद्रुक अंतर्गत लाईन पदावर असलेले कमलेश मुंडरे वय ३६ चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील रहीवाशी असुन पत्नी आपल्या दोन मुलासह शेगाव येथे राहत होते.

मुंडरे यांना मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन असून दुपारच्या सुमारास पंखीला लटकत पत्नीला दिसतात शेजारील नागरिकांच्या साहाय्याने उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार करीता दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले याची अधिक माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असुन अधिक तपास ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल कवरासे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये