बोगस मतदार समाविष्ट करणाऱ्यांची नावे उघड करण्याचे सोडून मतदार याद्या तपासण्याचा आदेश
शिक्षक बीएलओंवर प्रचंड ताण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील बोगस मतदार समाविष्ट करण्याचा प्रश्न लावून धरल्याने देशभर हा मुद्दा चांगलाच गाजत आहे यामुळे निवडणूक आयोग चांगलीच पोलखोल झाली असून निवडणूक आयोग भाजप करिता वोट चोरी करत आहे असे आता जनतेला वाटू लागली आहेत
राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. सुभाषजी धोटे यांनी बोगस मतदार समाविष्ट करणाऱ्यांची नावे उघड करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता निवडणूक आयोग बोगस मतदार नोंदणी कोणी केली मुख्य सूत्रधार कोण ? हे जाहीर करण्याऐवजी राजुरा विधानसभा क्षेत्रातील बीएलओना सन 2002 च्या मतदार यादी देऊन 2024 च्या मतदार यादी तपासा यात किती व कोणती नावे वगळली आहे व कोणती नवीन नावे समाविष्ट झाली आहेत कोणती नावे दुबार जोडली आहेत याबाबत युद्ध स्तरावर शोध घेण्याचा फर्मान केला
मोठ्या प्रमाणात शिक्षक BLO आहेत सन 2002 व सन 2024 या दोन्ही मतदार याद्यांचा तुलनात्मक अभ्यास करून समाविष्ट नावे, वगळलेली नावे व दुबार नावे याचा संपूर्ण लेखाजोखा BLO ना बनवून द्यायचा आहे यामुळे कामाचा मोठा ताण या शिक्षक BLO वर आला आहेत
निवडणूक आयोग बोगस मतदार समाविष्ट करणाऱ्यांचे नाव उघड का करत नाही असा सवाल काही BLO नी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविला आहेत राजुऱ्याचे एसडीओंचा मतदार यादी तपासणीकरिता BLO वर चांगलाच दबाब असल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक आयोगाने बोगस मतदार समाविष्ट करणाऱ्यांचे नाव लवकरात लवकर उघड करावे अशी मागणी आता जनतेतून जोर धरत आहे.
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 2002 व 2024 च्या मतदार यादीतील दुबार नावे व वेगळलेली नावे व नवीन समाविष्ट नावे याबाबत संपूर्ण माहिती एका क्लिकवर अगदी सहज मिळविता येते परंतु असे न करता BLO कडून एक एक नावाचा शोध घ्या संपूर्ण याद्या पडताळणी करा असा फर्मान निवडणूक आयोगाने दिला आहे
राजुरा विधानसभा क्षेत्रातील बोगस मतदार समाविष्ट करणाऱ्यांचे नाव उघड करण्याऐवजी निवडणूक आयोग जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करीत आहे. निवडणूक आयोगाने राजुरा विधानसभा क्षेत्रात बोगस मतदार समाविष्ट करणाऱ्यांचे नाव तात्काळ उघड करावे अशी आमची मागणी आहेत शिक्षकांना शिक्षकांचे काम करू द्या त्यांच्यावर उगाच ताण टाकू नका
अभय मुनोत, नांदा
मोबाईल – 7030155390