ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओबीसींच्या भविष्यासाठी भेटी गाठी जनजागृती अभियान संपुर्ण जिल्हात राबविणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             मातोश्री सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना व जात संघटनायांची बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली या सभेत ओबीसीच्या मागण्यांसाठी 21 दिवस अन्नत्याग आंदोलन, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, स्वाधार योजना सुरू करण्यात यावी,

या व इतर 22 मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेले आंदोलन 30 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर दिनांक 29 सप्टेंबर ला राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार,ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले. तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिले.

उपोषण सोडायला आलेले उपमुख्यमंत्री यांनी पुढील तीन दिवसात या सर्व मंजूर मागण्यांचे इतिवृत्त प्रकाशित करू असे बोलले. परंतु अजून पर्यत इतिवृत्त दिलेले नसल्यानें सरकारचा निषधाचा ठराव करण्यात आला, ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, विजय बलकी व प्रेमानंद जोगी यांचा नागरी सत्कार कार्यक्रम दिनांक 30 ऑक्टोबर प्रियदर्शन सभागृहात सायंकाळी 6 वाजता घेणार आहे.

ओबीसीत मोडणारे खासदार,आमदार यांनी अजून पर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून देऊ नये असे निवेदन सरकारला दिले नाही आहे. त्यांना तसे निवेदन देण्यासाठी भाग पाडणे आणि 1 नोव्हेंबर 2023 रविंद्र टोंगे यांच्या वेंडली ता चंद्रपूर गावापासून “ओबीसींच्या भविष्यासाठी भेटी गाठी जनजागृती अभियान “सुरू करून जिल्ह्यातील संपूर्ण 15 तालुक्यात अभियान राबविण्यात येणार असून सामारोप चिमूर तालुक्यात करण्यात येइल.

यावेळी सभेला विदर्भ तेली महासंघाचे प्रा सूर्यकांत खणके, माळी महासंघाचे अरुण तिखे, रामभाऊ खडलिंगे, प्रा अनिल शिंदे नंदू नागरकर, पप्पु देशमुख, रविंद्र टोंगे, विजय बलकी, प्रेमानंद जोगी, डॉ दिलीप कांबळे, शाम लेडे,राजेश बेले, श्रीधर मालेकर,कृनाल चहारे, अरूण देऊलकर, एम वि पोटे, प्रा सुरेश विधाते, प्रा बबन राजूरकर, देवराव दिवसे, प्रदीप पावडे, दिनेश कष्टी, विनोद शेंडे, गणपती मोरें, अक्षय येरगुडे, देवा पाचभाई,शखील शेख, पांडूरंग गावतुरे बंडू लेनगुरे, नाझीर गुलाब कुरेशी, महेश खगार, विलास माथनकर सुधाकर काकडे सुनिल मचणवार,देवराव सोनपित्तरे, अवधुत कोटेवार, रणजित डवरे, भाऊराव झाडे, बाबूराव पारखी,गणेश आवारी, हितेश लोडे,मनिषा बोबडे, कुसुमताई उदार, रजनी मोरे, गोमती पाचभाई उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये