ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बुद्ध धर्म जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म : पूज्य भदन्त नागार्जुन शुरेई ससाईजी

अंतराष्ट्रीय धर्म संमेलनामध्ये बौद्ध धम्माला जगातला सर्वात श्रेष्ठ धर्म म्हणून पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळा समिती भद्रावतीच्या वतीने दोन दिवसीय ‘भव्य बौद्ध धम्म सोहळ्याच्या’ पहिल्या दिवशी उपस्थित जनसमुदयास धम्म देसना देतांना पूज्य भदन्त नागार्जुन शुरेई ससाई मन्हाले की जेनेवा मध्ये झालेल्या अंतराष्ट्रीय धर्म संमेलनामध्ये बौद्ध धम्माला जगातला सर्वात श्रेष्ठ धर्म म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे.

त्यात जगभरातील 200 पेक्षा अधिक सर्वधर्माचे धर्मगुरु उपस्थित होते. बुद्ध धम्म मानवतेवर आधारित धर्म आहे, यात कसलेही कर्मकांड नाही, श्रद्धा – अंधश्रद्धा नाही, हा अहिंसेची शिकवणदेणारा एक मात्र धर्म आहे. ते पुढे सांगतात की भद्रावती नगरी हि नाग लोकांची एतिहासिक नगरी आहे. याला जुडलेला संपूर्ण इतिहास हा बुद्धावर आधारित आहे. इथे असलेली एतिहासिक बुद्ध लेणी ही पर्यटक स्थळ बनली पाहिजे असे सांगत त्यांनी लेणी वर असलेलेली बुद्ध लेणी व मूर्ती ची देखरेख करण्याकरिता कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नाना देवगडे यांना जनसमुदया समोर जाहीर पने आदेशित केले की पुढील बुद्ध लेणीची संगोपनाची जवाबदारी घेतील.

पुढील होणाऱ्या बुद्ध लेणीच्या कामकाजाची त्यांना माहिती पुरवतील, त्यांनंतर त्यांनी 10 कुटुंबांना हजारो लोकांच्या उपस्थित धम्म दीक्षा देण्यात आली. या प्रसंगी भन्तेजी चे भद्रावती प्रवेश द्वार येथे भव्य स्वागत बौद्ध अनुयायांन द्वारे करण्यात आले. दुद्ध लेणी ला भेट व वंदन करण्यांत आले नंतर भव्य बौद्ध धम्म रली काढण्यात आली तिथे विविध कार्यक्रम पूज्य भन्तेजी यांच्या उपस्थिस्त पार पडेल. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.जगृती पंकज शेंडे यांनी केले तर प्रास्ताविक शिल्पा नागराळे व आभार मानसी देव यांनी मानले . कार्क्रमाला यशस्वी करण्या करिता समितीची युवा कार्यकारिणी अध्यक्ष आदर्श मेश्राम,उपाध्यक्ष सचिन उगले, सचिव वैभव पाटील, महासचिव संकेत चिमूरकर,सहसचिव विकास दुर्योधन, कोशाधक्श अनिकेत रायपुरे,जय दारुंडे, बिपीन देवगडे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये