ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा पक्ष केवळ काँग्रेसच – आ. प्रतिभाताई धानोरकर

भद्रावती शहरात 150 पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

आजपर्यंतच्या इतिहासात सर्वसामान्य जनतेला व गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केवळ काँग्रेस पक्षाने केला आहे. सध्याची मोदी सरकारची नीती पाहता या गोरगरिबांचा व सामान्याचा पुन्हा एकदा विश्वास केवळ काँग्रेस पक्षावरच बसला आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या या धोरणाने प्रेरित होऊन शहरातील विविध पक्षांच्या व संघटनांच्या १५० पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून ही काँग्रेस पक्षाच्या विश्वासाची बाब आहे, असे प्रतिपादन आमदार प्रतिपादन धानोरकर यांनी केले. शहरातील बालाजी सभागृहात काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रवेश होण्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात त्या बोलत होत्या.

     यावेळी व्यासपीठावर आमदार प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, कामगार नेते धनंजय गुंडावार, धर्मेंद्र हवेलीकर, लक्ष्मण बोढाले, सरिता सूर, विनयबोधी डोंगरे, तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे,नगरसेवक शितल गेडाम, प्रतिभा सोनटक्के, लीला ढुमणे, सरपंच कोंढा महेश मोरे, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात संदीप कुंमरे यांच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या उत्साहात काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा घालून त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला व त्यांचे स्वागत करण्यात आले. विविध पक्षांच्या व संघटनांच्या १५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असून काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त केल्यामुळे आगामी निवडणुकात हा पक्ष जोरदार यश संपादन करेल असा विश्वास यावेळी आमदार धानोरकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रितेश वाढइ, छोटू धकाते, शिवाजी कोंबे, सचिन पचारे, महेश कोथळे, जितेंद्र मरस कोल्हे, निखिल तुमसरे, सागर सादमवार, पिंटू कार्लेकर ,योगेश- मयूर नागपूरे, आदींनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये