चांदा पब्लिक स्कूल येथे प्राथमिक विभागात विद्यार्थी मंत्रीमंडळाची स्थापना

चांदा ब्लास्ट
विद्यार्थी दशेत जीवन जगत असतांना अगदी लहानपणा पासून आईवडील, गुरू त्यांच्या आदर्शाच्या नियंत्रणात राहून नियमबद्ध जीवन व्यतीत करणे म्हणजेच शिस्त होय. हीच शिस्त योग्य वेळेत लागावी व आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी हाच हेतू लक्षात घेता चांदा पब्लिक स्कूल येथे पूर्व प्राथमिक विभागात विद्यार्थी मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थी मंत्रीमंडळातील पद मिळविण्याकरीता विद्यार्थ्यांना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी बौध्दिक, मानसिक, शारिरीक अशा चाचण्यांमधून जावे लागते. तेव्हाच विशिष्ट पदाकरीता त्यांची नियुक्ती करण्यात येते. पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थी मंत्रीमंडळातील नवनियुक्त सदस्यांमध्ये विद्यार्थी प्रमुख प्रियांश डावरे, उपविद्यार्थी प्रमुख तृषा काळे यांची तर आचार्य चाणक्य हाऊस प्रमुख मोलिशा अक्केवार, उपप्रमुख हिमांशू जुमनाके, महर्षी पाणीनी हाऊस प्रमुख श्रीयोग गेडाम, उपप्रमुख नियती सिंग, महर्षी वेदव्यास हाऊस प्रमुख योग ठणके, उपप्रमुख हमीद हुसेन, महर्षी चरक हाऊस प्रमुख सौम्या शहा, उपप्रमुख ज्ञानी चौधरी यांची निवड करण्यात आली. विधीवत हाऊस मास्टर आचार्य चाणक्य सौ. साधना वाढई, महर्षी पाणीनी हाऊस मास्टर श्री. संघपाल भसारकर, महर्षी वेदव्यास हाऊस मास्टर सौ. जास्मिन हकीम, महर्षी चरक हाऊस मास्टर सौ. रूहीना तबस्सूम यांनी वरील विद्यर्थ्यांना हाऊसचा झेंडा देत आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
प्रमुख अतिथींच्या हस्ते नवनिर्वाचित विद्यार्थ्यांना मंत्रीमंडळाची शपथ देण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे म्हणाल्या की, स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सतत प्रयत्नशील रहा, तरच जबाबदार नागरीक होण्याकरीता दिशा मिळेल.
शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी नवनिर्वाचित विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. गोपाल मुंधडा यांनी विद्यार्थ्यांना समाजात जर आपली ओळख बनवायची असेल तर त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. ते योग्य मार्गदर्शन व दिशा चांदा पब्लिक स्कूल येथे देण्यात येते असे वक्तव्य केले.
तसेच कार्यक्रमाच्या अतिथी डॉ. रूजूता मुंधडा यांनी विद्यार्थ्यांप्रती आपले कर्तव्य कसे पाळायचे, विद्यार्थ्यांचे काय कर्तव्य असते याची जाण करून दिली.
संपूर्ण कार्यक्रमाचा कार्यभार पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांनी सांभाळला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनिषा नागोशे व आभार प्रदर्शन सौ. संगीता बाग यांनी तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता क्रिडा शिक्षक श्री विनोद निखाडे, प्रणोती चौधरी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.