ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अकोल्यात खेळ रंगला पैठणी स्पर्धेचे बक्षीस वितरण

चांदा ब्लास्ट

दै मातृभमीच्या वतीने खास महिला साठी नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत, या अंतर्गत खेळ रंगला पैठणी चा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला,या स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्पना हेडाऊ यांनी पटकाविला द्वितीय क्रमांक ज्योत्स्ना मुंडोकार यांनी तर तिसरा क्रमांक सविता मुंढे यांनी पटकावला, तिन्ही भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणीचे वाटप माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया व माहेर साडी कलेक्शन च्या संचालिका सेवानिवृत्त प्राचार्या प्रतिभा पाथरीकर यांच्या हस्ते करण्यात आले,तीन पैठणी दै मातृभमी व माहेर साडी कलेक्शन यांच्या वतीने देण्यात आल्या.

यावेळी दै मातृभमी चे वृत्त संपादक रूबेन वाळके,जाहिरात व्यवस्थापक विनय टोले,मातृशक्ती च्या संयोजिका प्रियंका देशमुख प्रामुख्याने उपस्थित होत्या.
माजी आमदार बाजोरिया व इतरांनी दै मातृभमी च्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये