ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत विद्याविहार कॉन्व्हेंटची माऊंट कॉन्व्हेंटवर बाजी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगर जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत विद्याविहार कॉन्व्हेंट हायस्कुल चंद्रपूर येथील 17 वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंनी माऊंट कारमेल कॉन्व्हेंट चंद्रपूरच्या चमूवर मात करीत बाजी मारली. सदर विजयी चमूची विभागीय स्तरावर निवड झाल्याने ही चमू वर्धा येथे आयोजित विभागीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे.

विद्याविहार कॉन्व्हेंट हायस्कुलच्या या क्रिकेट चमूतील ओम ठाकुर (कर्णधार), अमन भट्ट, आशय बनकर, अभिनव बारसागडे, शंतनू विझे, मयंक कुशवाह, गौरव गेडाम, राघव शर्मा, (उपकर्णधार) अंशुल तागडे, किश नौकरकर, केतन शिरपूरे यांनी बहारदार कामगीरी बजावून घवघवीत यशाला गवसणी घातली. प्राचार्या शोभा रेड्डी यांच्या मार्गदर्शनात क्रीडा शिक्षक माहुरे, यांच्या अनुभवी नेतृत्वात विद्याविहारने हे यश संपादन केले.

विजयी विद्यार्थी चमूचे प्राचार्या शोभा रेड्डी, संस्थेचे अध्यक्ष रेड्डी सर, कृष्णा रेड्डी, शिक्षक व कर्मचारीवृंद तसेच पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये