ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लक्षणे दिसल्यास वेळीच निदान करून उपचार घ्या – आ. धानोरकर

स्तन कर्करोग जागरूकता आणि कर्करोग चाचणी शिबिर

चांदा ब्लास्ट

स्तन कर्करोग हा जगातील सर्वात सामान्य कर्करोग प्रकारांपैकी एक आहे. लवकर निदान आणि उपचार केल्यास या आजारातून बरे होण्याची शक्यता असतेच. या शिबिरामुळे महिलांना स्तन कर्करोगाच्या बाबतीत जागरूक होण्यास आणि लवकर निदान होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.

दिनांक ४ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामपंचायत निमसडा, वरोरा येथे आयोजित कॅन्सर जनजागृती आणि कॅन्सर तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड, जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन, वरोरा, जीडब्ल्यूईएल समृद्धी लेडीज क्लब, राष्ट्र संत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जीडब्ल्यूईएल समृद्धी लेडीज क्लब अध्यक्षा मेधा देशपांडे , ग्रामपंचायत निमसडा सरपंच जयश्रीताई चौधरी यांची उपस्थिती होती.

या शिबिराचा उद्देश म्हणजे, स्तन कर्करोगाची जागरूकता निर्माण करणे, स्तन कर्करोगाच्या लक्षणांविषयी माहिती देणे, स्तन कर्करोगाच्या चाचण्यांसाठी महिलांना प्रोत्साहित करणे आदी होते.

या शिबिरात काही मोफत चाचण्या करण्यात आल्या. स्तन एक्स-रे (मॅमोग्राफी), स्तन रक्त चाचणी करून महिलांची तपासणी करण्यात आली. कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर कृपया त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी महिलांना केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये