ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव मही येथे देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसे जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
देऊळगाव मही येथील एका पेट्रोल पंप वर एका तरुणांकडे देशी कट्टा व जिवंत काडतुसे असल्याची गुप्त माहिती देऊळगाव राजा पोलिसांना मिळताच एका युवकाला देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसे सह 30 सप्टेंबर च्या रात्री अटक केली आहे.
आरोपी ने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र सावध असलेल्या पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपी चे नाव विशाल उर्फ कैलास नारायण दिघे असे आहेत,सदर कारवाई पोलीस निरीक्षक संतोष महल्ले,हेमंत शिंदे,कलीम देशमुख,विश्वनाथ काकड आदींनी केली आहे.