ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा महामंत्री प्रशांत डाखरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित

भव्य रोगनिदान शिबीरात 200 रूग्णांची तपासणी व शेकडो नवमतदारांची नोंदणी

चंदा ब्लास्ट

भद्रावती शहर भाजपाच्या वतीने दि. 01 ऑक्टो. 2023 रोजी भव्य रोगनिदान व उपचार तसेच नवमतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. भाजपा नगरसेवक तथा पक्षाचे शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबीराचे उदघाटन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे शुभहस्ते संपन्न झाले.

भद्रावती येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित विविध आजारांकरीता मोफत रोगनिदान व नव मतदार नोंदणी शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते करण देवतळे, वरोरा न.प.चे माजी अध्यक्ष अहतेशाम अली, ज्येष्ठ नेते चंद्रकांत गुंडावार, माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, माजी जि. प. सदस्य विजय वानखेडे, माजी नगराध्यक्ष अॅड. सुनिल नामोजवार, माजी न.प. सदस्य प्रशांत डाखरे, मुकूंद राजूरकर, अफजल भाई, आशीष पोटे, अमित गुंडावार, डॉ. अंकुश आगलावे, गोपाल गोसवाडे, अॅड. युवराज धानोरकर, अमित गुंडावार, अर्चना गुंडावार, लताताई भोयर यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित रुग्णांची मधूमेह, सिकलसेल, एचआईवी, रक्तदाब व अन्य आजाराचे निदान उपस्थित डॉक्टरांनी केले. उपचारासाठी पात्र रुग्णाना शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत निवड करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे. सुमारे 200 हून अधिक रुग्णांची तपासणी व शेकडो नव मतादारांची नोंदणी करण्यात आली.

या आरोग्य शिबीरात बालरोगतज्ञ डॉ. भावेश मुसळे, स्त्ररोगतज्ञ डॉ. दीपाली मुसळे, अस्थिरोगतज्ञ डॉ. विनोद मुसळे, किडनी तज्ञ डॉ. राकेश अंबाती व हृदयरोग तथा मधुमेह तज्ञ डॉ. रागीनी राव अंबाती यांनी रुग्णांची तपासणी व उपचार केले. यावेळी हंसराज अहीर यांनी या आरोग्य शिबीरात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे धन्यवाद करीत त्यांच्या सेवेबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन विवेक सरपटवार यांनी केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी नाना हजारे, बबलू सय्यद, चेतन स्वान, इम्रान खान, प्रज्वल नामोजवार, श्रुती नामोजवार, स्वाती डाखरे, ममता गंडाईत, राम मत्ते, प्रदिप मांडवकर, अभिजित नारळे, संदिप बोकारे, श्रीपाद ठाकरे, मोनु पारधे, यांचेसह अनेकांनी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशांत डाखरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित डॉक्टरांचेही सेवा दिल्याबद्दल स्वागत केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये