पाथरी येथील आठवडी बाजार अतिक्रमनाच्या विळख्यात
पाथरी ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील पाथरी हे सर्वात मोठी बाजारपेठ असलेले आणि महत्वाचे गांव सध्या पाथरी गावाची तालुका निर्मितीकडे वाटचाल सुरु असतानाच मात्र येथीलच एका कापड व्यावसायिकाने परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बाजार ओठ्यावर ग्रामपंचायतच्या काही पदाधिकार्याना हाताशी धरून अतिक्रमण केले. हा प्रकार गावकर्यांच्या लक्षात येताच ऑगष्ट महिन्यात झालेल्या ग्रामसभेत सदर अतिक्रमाणाचा ठराव हानून पाडला. व सभाध्यक्षाणी सदर अतिक्रमण हटविण्यात येईल असे गावकऱ्यांना ठोस आश्वासन देण्यात आले.
असे असताना मात्र अतिक्रमणदार कापड व्यवसाईक यांनी सदर अतिक्रमण मुजोरीने सुरु ठेवले त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अतिक्रमणदार यांच्या आर्थिक व्यवहार झाला की काय असा प्रश्न गावकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून गावकऱ्यांनी प्रतिकात्मक आंदोलन सुरु केले आहे. असे पक्के अतिक्रमण होत राहिल्यास भविष्यात बाजारासाठी जागा अपुरी पडण्याची संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो यामुळे गावकऱ्यांनी सदर बाजार ओट्यावरच अतिक्रमण करण्याचा निर्णय घेतला ह्यावर आता ग्राम पंचायत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.