ताज्या घडामोडी

पाण्याच्या टंकी वरून पडून कामगाराचा मृत्यू

चांदा ब्लास्ट :अतुल कोल्हे भद्रावती –

तालुक्यातील पिरली येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करत असताना कामगाराचा पाण्याच्या टंकी वरून खाली पडून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारला चार वाजता घडली. याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

पांडुरंग बिसेन कोलते वय ४५ वर्ष राहणार पिरली असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पिरली येथील पाण्याच्या टाकीचे वाघेडा रस्त्यावर बांधकाम चालू असताना. त्या कामगाराला काम करत असताना कोणतीही सुरक्षा नसल्याने कामगाराचा तोल जाऊन तो खाली पडल्याने गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची भद्रावती पोलिसांनी नोंद घेतली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये