ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिजामाता महिला गृहउद्योग सहकारी संस्था भद्रावतीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

येथील नुकतेच जिजामाता महिला गृहउद्योग सहकारी संस्था भद्रावती र. नं – 241 संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष सुषमा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण आमसभा पार पडली.

सर्व प्रथम मा जिजामाता. मा सावित्रीबाई फुले व रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला मल्यारपण व वंदन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून सुषमा शिंदे, वंदना गैनवार, मनीषा बोरकर, शारदा शिंदे, चंद्रकला परोधे, शीतल पवार, सुनंदा डुकरे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते व पाहुण्यांचे स्वागत पुष्पमालेने करण्यात आले.

अध्यक्ष भाषण करताना सुषमा शिंदे म्हणाले की या संस्थे मार्फत सन उस्त्व त्योहारात जे काही पदार्ध जसे नमकिन. मिठाई. शेव. चकल्या. मसाले व इतर साहित्य बनविण्यात येते व गरजू बेरोजगार महिलांना आम्ही स्व्यरोजगार देत असते आणि मार्गदर्शन शिबिर घेत असते संस्थेच्या गृहउद्योगातील बनविलेला सर्व तयार साहित्य – माल शोटे मोठे बाजारपेठेत विक्रीला पाठविण्यात येते व ग्राहकांच्या मागणीनुसार आर्डर सुध्दा आम्ही घेत असते असे त्या म्हणाल्या तसेच अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या वार्षिक सर्वसाधारण आम सभेमध्ये खालील प्रमाणे ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले मागील आमसभा कार्यवाही वाचून कायम करण्यात आले. सन 2022 – 2023 चे वार्षिक हिशोबाची पत्रके जमाखर्च – व्यापारी पत्रक – नफा तोटा पत्रक व ताळे बंदी. वाचून मंजूर केले.

सन 2023- 2024 चे अंदाज पत्रकास मंजुरी दिली.
संस्थेचे सन 2022 – 2023 चे ऑडिट नोटचे वाचन करून दोष दुरुस्तीस मान्यता देण्यात आली.

सन 2023 – 2024 करिता संस्थेचे वैधानिक लेखा परीक्ष काची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे नवीन उद्योग धोरण आखणे बाबत विचार करण्यात आले. संस्थेची बाहेरील कर्ज मर्यादा ठरविण्यात आले व काही इतरही ठरावा बाबत चर्चा करण्यात आली.

या वार्षिक सर्वसाधारण आमसभा मध्ये मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृत्तिका इंगळे यांनी केले संचालन किरण महालक्षमे यांनी केले तर आभार लीला कूटेमाटे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करणे करिता मिरा कल्लो, ताई वेलफुलवार. कोमल गैनवार, सत्यभामा ताजने, वनिता नवघरे स्मिता उपलंचीवार, ज्योती गुंडावार किरण महेंद्र, शकुंतला वेलफुलवार, प्रमिला पिपंळकर. शीतल वेलफुलवार इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये