ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहिणीला मारहाण प्रकरणी विचारपूस करणाऱ्या भावाला आरोपीने डोके फोडून केले रक्तबंबाल

आरोपीवर 307 अंतर्गत गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर – येथील श्रीराम वॉर्ड रहिवासी मुलगी ही आपल्या मैत्रिणी सोबत नवीन बस स्थानक समोरील आईस्क्रीमचा दुकानात आईस्क्रीम खात असतांना आरोपी अंकित मोरे रा, रानी लक्ष्मी वॉर्ड याने कोणतेही कारण नसताना तिथे येऊन मुली ला तू माझ्या सोबत का बोलत नाही या कारणाने वाद घालून शिवीगाळ करून थापड मारून निघून गेला असता तिने तिचा भाऊ व वडिलांना फोन द्वारे सांगितले. साय सात – आठ वाजताचा सुमारास अंकित मोरे वस्ती विभाग गांधी पुतळ्याचा लागून असलेल्या बगीच्यात दिसून आला असता तेथे दोघेही वडील मुलगा आरोपीला विचारपूस करीत माझा मुलीला का मारले असे विचारले असता आरोपीनी सांगितले की तुमची मुलगी माझी मैत्रीण आहे.

या कारणावरून वाद जास्तच वाढल्याने आरोपी अंकित याने मोठा दगडाने मुलीचा भाऊ पुषकेश बहुरिया (17)याचा डोक्यावर वार करून रक्तबंबाल केले आणि तेथून पळून गेला, तेथील काही लोकांनी जखमी पुषकेश याला ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता जखमी असल्याने त्याला चंद्रपूर रेफर केले व तेथून नागपूरला हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ही घटना 30 एप्रिल 24 रोजी साय. आठ वाजताचा दरम्यान घडली दि. 1 मे रोजी सकाळी चार चा दरम्यान जखमीचे वडील गोपाल देवकुमार बहुरिया (55)यांनी पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध रिपोर्ट दाखल केली.

रिपोर्ट दाखल होताच पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक तळी यांना आरोपी ला अटक करण्याचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक तळी यांनी सकाळी आठ चा दरम्यान आरोपीला अटक करून आरोपीवर अ.प.  क्र,448/24कलम 307,323,504, IPC अंतर्गत कारवाई केली. पुढील कारवाई ठाणेदार आसिफ राजा शेख यांचा मार्गदर्शनातं सहाय्यक निरीक्षक प्रवीण तळी करीत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये