ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत दिवंगत खासदार बाळू धानोरकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर

वाल्मिकी गणेश मंडळाचा उपक्रम : 60 रक्तदात्यांनी केले रक्तदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

                दिवंगत खासदार बाळू धारूरकरांच्या स्मृती प्रित्यर्थ शहरातील भोजवाड येथील वाल्मिकी गणेश मंडळातर्फे वाल्मिकी चौकात रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात 60 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या समाजाप्रती असलेल्या भावना स्पष्ट केल्या.

या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष आणि धारणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज गावंडे नगरसेविका शितल गेडाम माजी नगरसेवक प्रमोद नागोसे प्रशांत झाडे तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

रक्त हे मानवी शरीरातच तयार होते ते कृत्रिमरीत्या बनविता येत नाही त्यामुळे आजच्या काळातील अपघाताचे प्रमाण पाहता रक्ताची आवश्यकता नेहमी भासत असते त्यामुळे तरुण वर्गाने रक्तदान करून आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जपावी असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले अन्य मान्यवरांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले या आव्हानाला प्रतिसाद देत परिसरातील 60 युवकांनी रक्तदान केले रक्त संकलनासाठी नागपूर येथील आयुश रक्तपेढीच्या पथकाने सहकार्य केले शिबिराच्या यशस्वीते करता मंडळाचे अध्यक्ष विनोद गुळघाणे, शंकर होकम, सचिन पचारे, सनी धामदेरे,अमलाश कुमरे, संदीप कुमरे,बाळू पतरंगे, सनी लोहकरे, अभिनय लोहकरे, लखन चटपलीवार, नेहाल हाडे,विकास माधवी, मारोती माढरे, विनोद नागपुरे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये