ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतात दबा धरून बसलेल्या वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

ताडाळा येथील घटना

चांदा ब्लास्ट

मूल तालुक्यातील ताडाळा येथील शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक केलेल्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. सूर्यभान टिकले (५५) रा. चिचाळा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सकाळी सात वाजताच्या सुमारास सूर्यभान हा आपल्या शेतात पाहणी गेला असता दबा धरून बसलेल्या एका वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटना गावात माहिती होताच घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.

वनविभागाला ही माहिती देण्यात आली असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये