ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये एका महिलेची उपस्थिती

नागरिकांमध्ये वाढती चिंता

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर (घुग्घुस) – गेल्या काही आठवड्यांपासून घुग्घुस-महातरदेवी मार्गालगत, नागपूर बिर्याणीवाला दुकानाजवळ एक महिला संशयास्पद पद्धतीने राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. सदर महिलेला माया जयराज पीशे (मद्रासी) या नावाने ओळखले जात असून ती मूळची भद्रावती परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तिचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे दरम्यान आहे.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, या महिलेला दोन मुले आहेत. मात्र, ती आपल्या मुलांबाबत स्पष्ट माहिती देण्यास नकार देते. तिने केवळ एवढेच सांगितले की, तिचा एक मुलगा रामनगरमध्ये राहतो. मात्र, तो रामनगर घुग्घुसमधील आहे की इतर कुठल्या भागातील, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

महिलेशी संवाद साधण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, परंतु ती कोणतीही ठोस माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. तिच्या या वागण्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये शंका अधिकच बळावली आहे. नागरिकांची मागणी आहे की, पोलिस प्रशासन किंवा सामाजिक संस्थांनी यामध्ये लक्ष घालावे व तिच्या नातेवाइकांचा शोध घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. असे केल्यास अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी गैरजबाबदारीने वागणाऱ्यांना चांगला इशारा मिळू शकेल.

घुग्घुसमध्ये वाढत चाललेली मानसिक रुग्ण आणि बेघर लोकांची संख्या

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, घुग्घुस आता मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि बेघर लोकांचे केंद्र बनत चालले आहे. दररोज येथे अनोळखी लोक दिसतात आणि काही काळाने ते रहस्यमयरित्या गायब होतात. यामुळे नागरिक संभ्रमात आहेत – हे लोक कोण आहेत, कुठून येतात आणि कुठे जातात, याचा काहीच मागमूस लागत नाही.

स्थानिक प्रशासनाकडे नागरिकांची विनंती आहे की, अशा घटनांकडे गांभीर्याने पाहावे आणि उपाययोजना कराव्यात, जेणेकरून घुग्घुसमधील नागरिक सुरक्षिततेची भावना बाळगू शकतील आणि हा परिसर पुन्हा एक स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थीत राहण्यास योग्य ठिकाण बनू शकेल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये