ताज्या घडामोडी

14 वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धेत आदर्श शाळा जिल्हास्तरावर

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा शाळेतील १४ वर्षे वयोगटातून जिल्हास्तरीय कब्बड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी राजुरा तालुकास्तरीय कब्बड्डी स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत अतिशय रोमांचक सामन्यात शिवाजी हायस्कुल राजुरा संघाचा केला पराभव करीत जिल्हास्तरावर भरारी घेतली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राजुरा तालुक्यातून 14 वर्ष आतील वयोगटातुन आदर्श शाळेने कब्बड्डी क्रीडास्पर्धेत दमदार एंट्री केली आहे. राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, स्काऊट मास्तर, क्रीडा मार्गदर्शक बादल बेले व पालक प्रतिनिधी प्रकाश आमनर यांच्या मार्गदर्शनात प्रथमच आदर्श शाळेचे विध्यार्थी तालुका स्तरीय क्रीडास्पर्धेत सहभागी होऊन जिल्हास्तरावर गेले आहे. या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे संचालक तथा माजी आमदार ऍड. संजय धोटे, अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबनानी, सचिव भास्कर येसेकर, सहसचिव शंकर काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकीवार, संचालक लक्ष्मण खडसे, मधुकर जानवे, अविनाश निवलकर, मंगला माकोडे, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, शालेय क्रीडा विभागातील शिक्षक विकास बावणे, जयश्री धोटे, भाग्यश्री क्षीरसागर, वैशाली चिमूरकर या सह सर्व शिक्षक, पालक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या विध्यार्थीचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बादल बेले यांनी विजयी संघ व सहभागी संघ, त्यांचे वर्गशिक्षक, शाळेच्या मुख्याध्यापिका यांना भेटवस्तू देऊन अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये