ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बसमध्ये विवाहित महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास

3 आरोपी विरोधात गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 विवाहित महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बस मध्ये तीन आरोपी नी लंपास केल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजता देऊळगाव राजा येथील बस स्थानक वर घडली, पोलिसांनी 3 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की फिर्यादी महीला शशिकला शिवराम मांटे, वय 60 वर्ष रा उंबरखेड ही दे. राजा बसस्थानक येथुन लोणार जाण्यासाठी सिंदखेडराजा बसमध्ये जात असतांना त्यांचे गळ्यातील सोन्याची पोत वजन अंदाजे 04 (चार) ग्रॅम व त्यामध्ये एक पिवळ्या धातुचे डोरले. त्यामध्ये 39 पिवळ्या धातुचे मणी कि.अं.30,000/- रु ची. आरोपी सौ महानंदा राम राठोड, रा हिरापुर जिल्हा बीड, सौ अनीता गोपाळराव उपादय,वय 38 वर्ष रा लाळी जिल्हा लातूर, सौ हरणाबाई बाबू सकट, वय 65 वर्ष रा देगलुर जिल्हा नांदेड,वरील आरोपीनी लंपास केले.

तिन्ही महिला आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये